लॉकडाऊनचा कालावधी वाढला, लोकांनी मजेदार मीम्सचा पाऊस पाडला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 02:14 PM2020-04-14T14:14:16+5:302020-04-14T14:23:43+5:30

ट्विटरवर लगेच #Lockdown2 ट्रेन्ड होऊ लागला. त्यावर लोकांनी अनेक मजेदार मीम्सही तयार केले आहेत.

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची घोषणा केली. आता देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. आधी हा कालावधी 14 एप्रिलपर्यंत होता. त्यामुळे ट्विटरवर लगेच #Lockdown2 ट्रेन्ड होऊ लागला. त्यावर लोकांनी अनेक मजेदार मीम्सही तयार केले आहेत.