हस्तीदंतासाठी मनुष्याने दाखवली क्रूरता, आता आफ्रिकेत दात नसलेले हत्ती येताहेत जन्माला!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 03:48 PM2018-11-27T15:48:26+5:302018-11-27T15:59:47+5:30

या जगात जनावरांचा सर्वात मोठा शत्रू कुणी असेल तर तो मनुष्य आहे. मनुष्याला स्वत:वर गर्व तर फार आहे. पण गर्व असण्यासारखी कामे कमीच केली असेल. असे यासाठी म्हणत आहोत, कारण जनावरांवर अत्याचार करण्यात मनुष्य पहिल्या क्रंमाकावर आहे. (Image Credit : tribune.com.pk)

फार पूर्वी हस्तीदंतापासून तयार करण्यात आलेल्या कलाकृती आणि दागिन्यांची क्रेझ वाढल्याने हत्तींची संख्या कमी झाली होती. पण १९८९ मध्ये हत्तीच्या दातांच्या विक्रीवर बंदी आणल्यावर आफ्रिकेत हत्तींची संख्या स्थिर झाली होती. (Image Credit : trofire.com)

असे असले तरी गेल्या काही वर्षांमध्ये छुप्या मार्गाने जगभरात हस्तीदंतासाठी अनेक हत्तीची कत्तल केली जात आहे. कारण एका हस्तीदंताची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखों रुपये आहे. काही लोका इतके क्रूर झाले आहेत की, आपल्या फायद्यासाठी ते मुक्या जनावरांची कत्तल करायलाही मागेपुढे बघत नाहीयेत. (Image Credit : cnn.com)

आफ्रिकन देशांमध्ये ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून आफ्रिका युद्ध पीडित महाद्वीप राहिलं आहे. युद्धादरम्यान हत्तींची तस्करी दात आणि मांसासाठी केली जात होती. या कारणाने आफ्रिकेत हत्तींची संख्या वेगाने कमी झाली आहे. (Image Credit : www.express.co.uk)

मोजाम्बिकच्या Gorongosa National Park मध्ये असलेल्या २०० मादा हत्ती आहेत. या मादा हत्तींचा युद्धादरम्यान जीव वाचला होता. यातील ५१ टक्के हत्ती दात असलेल्या आहेत. तर युद्धानंतर जन्माला आलेल्या हत्तींमध्ये केवळ ३२ टक्के हत्ती हे दात नसलेले आहेत. (Image Credit : nautil.us)

हत्ती संरक्षण आणि हस्तीदंताच्या बेकायदेशीर विक्रीवर लक्ष ठेवून असलेले इस्मोन मार्टिन म्हणाले की, 'आफ्रिकेमध्ये राहणारे चीनी नागरिक हे नक्षीकाम केलेले किंवा न केलेले हस्तीदात खरेदी करत आहेत. काही काळापूर्वी मी खारतुममध्ये होतो, त्यावेळी हस्तीदंताची तस्करी होत होती. यातील ७५ टक्के हस्तीदंत हे चीनमधून आणले होते'. (Image Credit : www.conservationindia.org)

ब्रिटिश सरकारनुसार, जगभरात बेकायदेशीर वन्यजीवांचा वार्षिक व्यवसाय हा सहा अरब पाउंड (सहा खरब रुपये) इतका आहे. गेल्यावर्षी साधारण २२ हजार हत्ती मारले गेले होते. (Image Credit : www.independent.co.uk)

गेंड्याच्या शिंगाची किंमत ४० हजार पाउंड(चाळीस लाख रुपये) प्रति किलो आहे. हे किंमत सोन्यापेक्षाही जास्त आहे.