'या' 5 राशीच्या व्यक्ती रिलेशनशिपऐवजी सिंगल राहणंच करतात पसंत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 11:50 AM2019-03-25T11:50:15+5:302019-03-25T11:54:56+5:30

रोमॅन्टिक डेट, लॉन्ग ड्राइव्ह, कॅन्डल लाइट डिनर आणि लाइफ-लॉन्ग कमिटमेंट यांसारख्या गोष्टी अनेक लोकांना भूरळ घालतात. पण यांपासून लांब काही लोक मात्र आपल्याच जगामध्ये खूश असतात. प्रत्येकाच्या आयुष्यातील गरजा आणि जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. यामध्ये सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे, कोणत्या व्यक्तीचा कोणत्या महिन्यात जन्म झाला आहे. ही गोष्ट त्यांच्या रोमॅन्टिक रिलेशनशिपबाबत अनेक गुपित उलगडण्यासाठी फायदेशीर ठरते. आज आम्ही तुम्हाला अशा 5 राशिंबाबत सांगणार आहोत, ज्या रिलेशनशिपमध्ये कमिटेड असण्याऐवजी सिंगलच फार खूश असतात.

धनु राशीच्या व्यक्तींना आपल्या आयुश्यात नेहमी नवीन गोष्टींबाबत एक्सपरिमेंट करायला आवडतं. त्यांना एखाद्या नात्यामध्ये कमिटेड होणं फारसं आवडतं नाही. त्यांना वाटतं की, जर ते एखाद्या नात्यामध्ये कमिटेड झाले तर त्यांच्यावर निर्बंध येतील. या राशीच्या लोकांना स्वच्छंद जगयाला फार आवडतं. त्यांना त्यांच्या कोणतेही निर्बंध लादलेले आवडत नाहीत.

कुंभ राशीच्या व्यक्तींना कोणत्याही रिलेशनशिपमध्ये राहायला फारसं आवडत नाही. ते एखाद्यासोबतच रिलेशनशिपमध्ये तेव्हाच सिरियस होतात, जेव्हा त्यांना त्या व्यक्तीसोबत प्रेम होतं किंवा विश्वास असतो. या व्यक्ती स्वतंत्र विचारांच्या असतात. इतर राशींप्रमाणे प्रेमामध्ये आकंठ बुडण्याची स्वप्न या व्यक्ती अजिबात पाहत नाहीत. या व्यक्तींना एकादी गोष्ट आपल्या हटके पद्धतीने करण्याची सवय असते.

सिंह राशीच्या व्यक्ती मनाने अत्यंत चांगल्या असतात. तसेच या व्यक्तींना जास्त सिरियस राहायला आवडत नसून त्या मस्तीच्या मूडमध्ये असतात. कधी-कधी या व्यक्ती अधिक स्वार्थी किंवा ईगोएटिक होतात. या राशीच्या व्यक्तींना नेहमीच लाइमलाइटमध्ये राहण्याची इच्छा असते. तसेच या गोष्टी त्यांना कोणासोबतही शेअर करायच्या नसतात. मग ती कोणतीही व्यक्ती असो, त्यांना त्यांच्या गोष्टी कोणालाही सांगायला आवडत नाही.

जर प्रेमाची गोष्ट असेल तर मिथुन राशीची लोक कॅज्युअल आणि कोणतीही कमिटमेंट नसणाऱ्या रिलेशनशिपमध्ये राहणं पसंत करतात. या राशीच्या व्यक्तींना लोकांना अडकवून ठेवणारं कोणतंही काम करायला आवडत नाही.

मेष राशीच्या लोकांना अडवेंचर्स करायला फार आवडत असून यांचा नेहमीच काहीना काही प्लॅन असतो. ते आपला पद्धतीने जीवन जगतात. या लोकांच्या सिंगल असण्याचा उद्देश म्हणजे, स्वतंत्र आयुष्य जगता येणं. त्यांना त्यांच्या गोष्टींमध्ये कोणीही हस्तक्षेप केलेला आवडत नाही.

वरील सर्व गोष्टी या अॅस्ट्रॉलॉजीनुसार सांगण्यात आलेल्या आहेत. यामधून आम्ही कोणत्याही गोष्टीचा दावा करत नसून प्रत्येकाचं आयुष्य त्याने कसं जगावं हा सर्वस्वी त्याचा प्रश्न असतो.