ऑफिसमध्ये सुरू असेल अफेअर तर वेळीच व्हा सावध, पडू शकतं महागात; कसं ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 11:51 AM2023-07-18T11:51:31+5:302023-07-18T12:29:22+5:30

Office Affair : काही लोकांसाठी हे नातं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारं ठरू शकतं. चला जाणून घेऊ काही आवश्यक गोष्टी....

जेव्हा बरेच लोक एका ठिकामी काम करण्यासाठी येतात तेव्हा काही लोकांचे अफेअर होणं सहाजिक आहे. ऑफिसमध्ये अफेअर असणं तर फारच सामान्य झालं आहे. पण ऑफिसमध्ये अफेअर करणं अनेक दृष्टीने महागात पडू शकतं. तर काही लोकांसाठी हे अफेअर मोटिवेशनसारखं काम करतं. तसेच काही लोकांसाठी हे नातं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारं ठरू शकतं. चला जाणून घेऊ काही आवश्यक गोष्टी....

चांगलं-वाईट - जर तुम्हाला ऑफिसमधील एखाद्या सहकाऱ्यासोबत बोलायला आवडत असेल किंवा त्या व्यक्तीसोबत डेटवर जायचं असेल तर काही गोष्टींचा आधी विचार करा. कारण हे नातं तुमच्या इतर नात्यांवर आणि करिअरवर वाईट प्रभावही करू शकतं.

द्वेष-राग ठेवू नका - ऑफिसमधील सहकाऱ्यासोबत रिलेशनमध्ये असणं तोपर्यंत ठीक आहे, जोपर्यंत दोघेही एकमेकांच्या भावनांचा सन्मान करतात. समोरच्या व्यक्तीने तुमचं प्रपोजल स्वीकारलं तर सगळं काही ठीक. पण समोरून नकार आला तर कोणत्याही प्रकारचा राग मनात ठेवू नका. याने तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो.

जबरदस्ती नको - तुमचं प्रपोजल स्वीकारण्यासाठी सहकाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका. कारण याने ऑफिसमधील वातावरण बिघडू शकतं. सोबतच तुमच्या प्रतिमेला डाग लागू शकतो आणि याने तुमचं करिअर प्रभावित होऊ शकतं.

ऑफिस पॉलिसी - ऑफिसमधील सहकाऱ्यासोबत डेटिंग सुरू करण्याआधी हे तपासून घ्या की, तुमच्या ऑफिस पॉलिसीमध्ये अ‍ॅंटी-फ्रॅटर्नाइजिंग क्लॉज तर नाही ना. रिलेशनशिपबाबतचं असं पाऊल ऑफिसमध्ये तेव्हाच उचला जेव्हा तुम्हाला कन्फर्म असेल की, ऑफिसमधील नियम तुम्ही तोडत नाही आहात.

कठीण आहे पण करावं लागेल - तुमच्या पर्सनल रिलेशनचा प्रभाव तुमच्या कामावर पडू नये. यासाठी गरजेचं आहे की, तुम्ही प्रोफेशनल वागावं. ऑफिस रोमान्समध्ये तेच लोक यशस्वी होऊ शकतात जे प्रोफेशनलिजमला व्यवस्थित हॅन्डल करू शकतात.

हेही होऊ शकतं - ज्या व्यक्तीसोबत तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, ती व्यक्ती सतत तुमच्या जवळ असेल तर तुमचं कामावरील लक्ष भटकू शकतं. त्यामुळे या गोष्टीचीही काळजी घ्या की, कामावर परिणाम होऊ नये. तशी मानसिक तयारी करा.

हे तर फेस करावंच लागेल - रिलेशनशिप सुरू करण्याआधी याचा विचार करा की, ऑफिसमध्ये गॉसिप्स सुरू होतील. जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही असं काही होणं रोखू शकाल तर तुम्ही चुकीचा विचार करताय. तुमच्याबाबत लोकांना असंही काही ऐकायला मिळू शकतात, ज्या तुम्हालाही माहीत नसतील. यासाठीही तुम्हाला तयार रहावं लागेल.