मुलांचं हस्ताक्षर सुंदर करायचंय?, वाचा या टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 02:51 PM2018-11-21T14:51:18+5:302018-11-21T14:55:52+5:30

1. हस्ताक्षराकडे मुलाचं दुर्लक्ष - अभ्यासात अव्वल गुण मिळवण्यासाठी हस्ताक्षर सुंदर असणं नाही, तर सर्व अभ्यास लक्षात राहणे गरजेचं असते, असा विचार मुलं करतात. त्यामुळे त्यांचे हस्ताक्षराकडे दुर्लक्ष होतं. खरं तर हस्ताक्षर वाईट असल्याच्या कारणामुळेही परीक्षेच्या पेपरमध्ये गुण कापले जातात. कारण तुम्ही काय लिहिले आहे हे शिक्षकांना समजलेच नाही तर ते गुण तरी कसे देणार.

2. स्टडी टेबल योग्य उंचीवर असावा - मुलं आरामदायी परिस्थितीत अभ्यास करू शकतील, लिहिताना मुलं आपले कोपर टेबलवर ठेऊ शकतील, इतक्या उंचीवर स्टडी टेबल असावा. शिवाय, सहजरित्या जमिनीवर पाय पोहोचू शकतील, अशी खुर्ची असावी.

3. पेन्सिल पकडण्याची पद्धत - मुलांना पेन्सिल पकडण्याची योग्य पद्धत शिकवावी. चुकीच्या पद्धतीनं पेन्सिल पकडण्याच्या सवयीमुळे लिहिण्यास अडचणी येतात आणि हातही दुखतो. परिणाम हस्ताक्षर बिघडते.

4. लेखी प्रोजेक्ट - आपल्या मुलांना लेखी प्रोजेक्ट देऊन हस्ताक्षर सुधारण्यास त्यांना प्रोत्साहन द्या. तुम्ही त्यांना मित्रांना पत्र लिहायला सांगा. कविता लिहिण्यास सांगा. शिवाय, वेगवेगळे ग्रिटिंग कार्ड्सही बनवण्यास प्रोत्साहन द्या. यामुळे त्यांचे हस्ताक्षर सुधारण्यास मदत होईल.

5. नव्या शैलीतील हस्ताक्षर - मुलांना हस्ताक्षराच्या वेगवेगळ्या शैली शिकवायच्या असतील तर त्यांच्यासमोर रायटिंग स्टाईलचे मॉडेल ठेवा. यासाठी वहीच्या प्रत्येक पानावर एक-एक अक्षर लिहून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिण्यास सांगा. यामुळे त्यांचा चांगला सराव होईल.

6. हस्ताक्षर सुधारण्यासाठी काही अन्य टीप्स : अ. सर्व अक्षर एकसारखी लिहिण्यास सांगा. यामुळे अक्षरही त्यांच्या लक्षात राहतील आणि हस्ताक्षरही सुधारण्यास मदत होईल. ब. दोन शब्दांच्या मध्ये योग्य प्रमाणात अंतर सोडण्यासही त्यांना सांगा.