Lokmat Mahamarathon Photos: पुणेकर जिद्दीनं धावले; लाेकमत महामॅरेथाॅनमध्ये हजारो नागरिकांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 04:01 PM2023-02-19T16:01:50+5:302023-02-19T19:06:56+5:30

पहाटेचा अल्हाददायक अंगाला झाेंबणारा गारवा, डीजे व गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरणारे ज्येष्ठांपासून तरूण- तरूणी व मुले, जय भवानी- जय शिवाजीचा जयघाेष आणि झुंबा डान्स करणारी तरूणाई अशा वातावरणात बालेवाडी शिवछत्रपती स्टेडियमच्या मैदानात लोकमत महामॅरेथाॅनला सुरुवात झाली. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये १४ हजाराहून अधिक पुणेकरांनी सहभाग घेतला होता. (सर्व छायाचित्रे - आशिष काळे, अतुल मारवाडी)

महा मॅरेथाॅनची पहिली फेरी माेठया उत्साहात पाच वाजून ४५ मिनिटांनी २१ किलाेमीटरची झेंडा दाखवून सुरवात झाली

पहाटेच्या गारव्यात नागरिकांनी झुंबा डान्स केला

तरूण - तरूणीच नव्हे तर ज्येष्ठांपासून अगदी तीन वर्षांच्या बालकेही देखील उत्साहाने सहभागी झाले

धावायला सुरवात करण्यापूर्वी प्रत्येकजण मैदानावर संगीताच्या तालावर वाॅर्मअप करत होते

शिवजयंतीनिमित्त ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घाेषणा शिवगर्जनेचा जागर देखील करण्यात आला.

शिवजयंतीनिमित्त अनेकांच्या हाती भगवा देखील फडकत हाेता

बाेचरी थंडी अंगाला झाेंबत असतानाच पहाटे पाच वाजल्यापासूनच बालेवाडीतील शिवछत्रपती मैदानावर धावपटू जमायला सूरवात झाली

‘भाग मिल्खा भाग’ हे गाणे लावण्यात येत हाेते. त्या गाण्याने धावपटूंच्या अंगात आणखी बळ संचारले

एकवीस किलाेमीटर, दहा, पाच आणि तीन किलाेमीटर अशा चार टप्प्यांत शिवछत्रपती मैदानावरून मॅरेथाॅनची फेरी निघाली

महामॅरेथॉनचा मनमुराद आनंद लुटताना हजारो पुणेकर