पुण्याचे उड्डाणपूल पण त्यांच्याखाली अस्वच्छतेची झूल !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 02:51 PM2019-05-27T14:51:31+5:302019-05-27T15:16:04+5:30

स्मार्ट सिटी असलेल्या पुणे शहरातील उड्डाणपुलांची दिवसेंदिवस दुरावस्था होत असून महापालिकेने त्यांच्या स्वच्छतेकडे आणि निगराणीकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.

काही पुलांखाली कचऱ्याचे ढीग साचले असून ते बघता अनेक दिवस स्वच्छताही झाली नसल्याचे निदर्शनास येत आहे

विद्यापीठच्या सामोरील उड्डाणपुलाखाली काही कुटुंब रात्री वास्तव्यास असतात

स्मार्ट सिटी अंतर्गत उड्डाणपुलाचे खांब सुशोभित केले असले तरी आजूबाजूची अस्वच्छता कायम आहे.

लहान मुलांसह महिलाही उड्डाणपुलाचा वापर आश्रयाकरिता करत आहेत.

कचरा टाकू नये या फलकाखालीच टाकलाय कचरा (सर्व छायाचित्रे : तन्मय ठोंबरे)