Flashback 2020 : राजकीय विधानांनी वर्ष गाजलं; पाहा कोण काय-काय म्हणालं!

By मोरेश्वर येरम | Published: December 31, 2020 05:52 PM2020-12-31T17:52:45+5:302020-12-31T18:50:04+5:30

२०२० या वर्षात राज्याच्या राजकारणात राजकीय नेत्यांनी केलेली कोणकोणती विधानं गाजली? त्यावर एक नजर...

२०२० हे वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे तर लक्षात राहीलच पण महाराष्ट्राच्या राजकारणात देखील यंदाचं वर्ष अतिशय महत्वाचं ठरलं. या वर्षात राज्यातील नेत्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली. त्यापैकी निवडक विधानांवर एक नजर...

'राज्यात बार, रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. मग प्रार्थना स्थळे बंद का? मंदिरे बंद ठेवण्याचे दैवी संकेत आपणास मिळत आहेत का? की तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात?': राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहेलेल्या पत्रात हे विधान केलं होतं.

मुंबईला पीओके म्हणणाऱ्याचं हसत स्वागत करणं माझ्या हिंदुत्वात बसत नाही. हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे का?- उद्धव ठाकरे

तुम्ही जनतेचे सेवक आहात, महाराष्ट्राचे ठेकेदार नाही- कंगना राणौत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थिल्लरबाजी करू नये- देवेंद्र फडणवीस

'मी कधी डॉक्टरांकडून औषधं घेत नाही, त्यांना काय कळतं? मी कंपाऊंडरकडून औषधं घेतो'- संजय राऊत

उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवर दिसले- राज ठाकरे

राज्य चालवणे हे येडागबाळ्याचे काम नव्हे; येत्या दोन महिन्यांत भाजपचे सरकार सत्तेत येईल- रावसाहेब दानवे

महाराष्ट्राला ड्रायव्हर नकोय, चांगला मुख्यमंत्री हवाय. उद्धव ठाकरे हे खेळण्यातले मुख्यमंत्री- नारायण राणे

कुणी जास्त अंगावर आलं तर हात धुवून मागे लागेन- उद्धव ठाकरे

कंगना राणौत नॉटी गर्ल, हरामखोर मुलगी - संजय राऊत

पार्थ पवार इममॅच्युअर, त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही- शरद पवार

"माझ्या भाषणात जो अडचणी आणतो, आडकाठी आणतो तो पुन्हा निवडून येत नाही"- सुधीर मुनगंटीवार अजित पवारांचं क्षणार्धात प्रत्युत्तर..."तुमचं आव्हान स्वीकारलं, मला पुढच्या वेळेस पाडून दाखवा"

कोल्हापुरातून आजही जिंकेन, हरल्यास हिमालयात जाईन- चंद्रकांत पाटील

आरेमधून कांजूरला मेट्रो कारशेड नेणं हा फक्त सरकारचा इगो; इच्छा तिथे मार्ग, टाईमपास तिथे कांजूरमार्गः देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी सरकार बैलासारखं; टोचल्याशिवाय पुढेच जात नाही- नितीन गडकरी

दहा-पंधरा वर्षांपूर्वी पक्षात उदयाला आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागले- एकनाथ खडसे

तुम्ही हे राज्य २५ वर्षे चालवा किंवा २७ वर्षे चालवा. पण हे कायद्याने चालवाः देवेंद्र फडणवीस

त्यांनी (भाजप) माझ्या मागे 'ईडी' लावली, तर मी 'सीडी' लावेन- एकनाथ खडसे