कुस्तीपटू राहुल आवारे झाला गुरु काका पवारांचा जावई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 10:40 AM2019-10-10T10:40:12+5:302019-10-10T10:43:02+5:30

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताला 61 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावून देणाऱ्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेने जागतिक कुस्ती क्रमवारीत गरुड भरारी घेतली आहे.

जागतिक स्पर्धेत राहुलने 61 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या टेलर ग्राफचा 11-4 असा पराभव केला.

2018 मध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले.

पुढच्याच वर्षी त्याने कनिष्ठ आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले. जागतिक कनिष्ठ स्पर्धेतही त्याने रौप्यपदक जिंकले. नुकतेच 'लोकमत'ने त्याला 'महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' या पुरस्काराने गौरविले होते.

बुधवारी कुस्तीपटू राहुल आवारे आणि ऐश्वर्या पवार यांचा साखरपुडा पुण्यात संपन्न झाला.

ऐश्वर्या ही राहुलचे वस्ताद आणि भारताचे माजी आंतरराष्ट्रीय पैलवान काका पवार यांची कन्या आहे.