इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 07:38 AM2024-05-16T07:38:45+5:302024-05-16T07:46:54+5:30
इंदूरमध्ये बुधवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घाटबिल्लादजवळ झाला.
मध्य प्रदेशातील इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घाटबिल्लादजवळ पार्क केलेल्या डंपरला कारने धडक दिली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. बेटमाजवळ रतलाम पासिंग कार रोडवर उभ्या असलेल्या डंपरला कार धडकली. डंपर वाळूने भरलेला होता. घटनास्थळी वाळू पसरलेली आहे. या अपघातात एक वृद्ध जखमी झाला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील सर्व कारमधून बँक तांडा येथून गुनाकडे जात होते. घटनेनंतर कार ज्या वाहनाला धडकली त्या वाहनाचा चालक फरार झाला. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर लोक घटनास्थळी पोहोचले आहेत. मृत कमलेश यांच्याकडून पोलीस कार्डही सापडले असून त्यात ते शिवपुरी येथे तैनात असल्याचे दिले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.
या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याचा शोध पोलीस शेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीपसह अपघातात सहभागी असलेले अन्य वाहन आणि त्याच्या चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी स्थानिक लोकांची चौकशी करण्यासोबतच सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेतली जात आहे.