दीपक हुड्डा बॉक्सर स्विटी बुरासोबत विवाहबद्ध, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 09:47 AM2022-07-09T09:47:12+5:302022-07-09T09:52:38+5:30

आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू आणि अर्जुन पुरस्काराचा मानकरी दीपक हुड्डा याने आंतरराष्ट्रीय बॉक्सर स्विटी बुरा हिच्यासोबत गुरुवारी लग्नगाठ बांधली.

आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू आणि अर्जुन पुरस्काराचा मानकरी दीपक हुड्डा याने आंतरराष्ट्रीय बॉक्सर स्विटी बुरा हिच्यासोबत गुरुवारी लग्न केले. स्विटीदेखील हरयाणा सरकारच्या भीम पुरस्काराची मानकरी आहे.

स्विटी हिसारच्या घिराय या गावची तर दीपक रोहतकच्या चमारिया गावचा आहे. दीपक-स्विटी यांची पहिली भेट २०१५ झाली. दोघांमध्ये घट्ट मैत्री होताच दीपकने स्विटीकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. लग्नात दोन्ही कुटुंबीयांसोबत मित्रमंडळींची उपस्थिती होती.

दीपकची कबड्डीत ‘डुबकी किंग’ अशी ओळख आहे. स्विटीला बॉक्सिंग रिंकमध्ये राणी नावाने ओळखले जाते. दोघांनी अनेक पदके जिंकली. लग्नाच्या वेळी दीपकने शेरवानी आणि स्विटीने लेहंगा परिधान केला होता.

लग्नसोहळ्यात अनेक खेळाडू उपस्थित होते. यावेळी त्यांनी सेल्फीदेखील घेतले. साऊथ बायपास येथे असलेल्या रतन पॅलेसमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

स्विटी आणि दीपक यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. स्विटीनं आजपर्यंत बॉक्सिंगमध्ये अनेक पदकं पटकावली आहेत.

दीपक आणि स्विटी यांची भेट २०१५ मध्ये एका मॅरेथॉनदरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दीपकनं प्रो कबड्डी लीगदरम्यान स्विटीला आमंत्रितही केलं होतं.