काश्मीरमध्ये डोंगररांगांनी ओढली सफेद चादर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 04:30 PM2017-11-15T16:30:29+5:302017-11-15T16:34:22+5:30

हिवाळा सुरु झाल्यानंतर उत्तर भारतातील पर्यटक बर्फवृष्टीची वाट पाहत असतात.

बुधवारी पहाटे काश्मीरच्या जनतेने मोसमातील पहिलीच बर्फवृष्टी अनुभवली.

. सोनमर्ग, गंदरबाल जिल्हा आणि आसपासच्या भागांमध्ये बुधवारी पहाटे तीन-चारच्या सुमारास बर्फवृष्टी झाली.

सोनमर्ग, गंदरबाल जिल्ह्यातील डोंगररांगांनी सफेद चादर अंगावर ओढल्याचे चित्र आहे. जम्मू-श्रीनगरच्या काही भागात पाऊसही कोसळला.

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जम्मूमध्ये पाऊस कोसळेल तसेच काश्मीरमध्ये उंचावरील प्रदेशात आणखी बर्फवृष्टीची शक्यता आहे.