Coronavirus : ...म्हणून विद्यार्थ्यांसाठी रोज झाडावर चढतो 'हा' शिक्षक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 11:59 AM2020-04-23T11:59:05+5:302020-04-23T12:17:22+5:30

Coronavirus : जीवनावश्यक सेवा वगळता उतर सर्व गोष्टी बंद आहेत. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आली आहेत.

भारतात कोरोनाचा धोका वाढत असून देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 21,393 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 681 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

जीवनावश्यक सेवा वगळता उतर सर्व गोष्टी बंद आहेत. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आली आहेत.

लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अनेक शिक्षक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत आहेत.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवताना अनेकदा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे पश्चिम बंगालमधील एका शिक्षकाने थेट झाडावरूनच विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय घेतला.

सुब्रत पाती असं या पश्चिम बंगालच्या शिक्षकाचं नाव असून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ते रोज झाडावर चढतात. तिथे रेंज चांगली येत असल्याने त्यांनी बसण्यासाठी जागा तयार केली आहे.

सुब्रत पाती हे पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील शिक्षण संस्थेमध्ये इतिहास विषय शिकवतात.

लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं हा त्यांना प्रश्न पडला होता. ऑनलाईन शिकवताना नेटवर्कचा प्रॉब्लेम होता.

सुब्रत यांना झाडावर जाऊन शिकवण्याची कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी झाडावर रेंज येईल अशा ठिकाणी बसून विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली.

रोज ठरलेल्या वेळेत ते या झाडावर येऊन पोहोचतात आणि आपला क्लास सुरू करून विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करतात.

सुब्रत यांनी ऑनलाईन क्लासला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सुब्रत यांचे झाडावरचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. (फोटो - biswabanglasangbad.com आणि ANI)