Atal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 03:44 PM2018-08-17T15:44:56+5:302018-08-17T16:14:42+5:30

आपल्या शांत व सौम्य स्वभावामुळे, मात्र सर्व प्रश्नांवर घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे केवळ देशातच नव्हे, तर जगभरात आदराचे स्थान मिळविलेले भारताचे माजी पंतप्रधान व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. अटलबिहारी वाजपेयी यांचे काही खास फोटो

19 फेब्रुवारी 1999 रोजी पाकिस्तानमधील शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीतून लाहोरला जाताना वाजपेयी.

11 एप्रिल 2002 रोजी अटलबिहारी वाजपेयी भारतापासून जवळपास 5 हजार किमी दूर असलेल्या कंबोडियामधील अंकोर येथे असलेल्या अंकोरवाट मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले होते.

24 सप्टेंबर 2003मध्ये वाजपेयी यांची अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्याशी न्यूयॉर्कमध्ये एका बैठकीदरम्यान भेट झाली होती.

9 डिसेंबर 2003 रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या भेटीदरम्यानचा फोटो.

अटलबिहारी वाजपेयी यांची 12 डिसेंबर 2003 मध्ये पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांनी नवी दिल्लीमध्ये भेट घेतली होती.

4 जानेवारी 2004 रोजी इस्लामाबादमध्ये एका मीटिंगदरम्यान पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती परवेज मुशर्रफ आणि वाजपेयी हस्तांदोलन करतानाचा फोटो

5 मे 2004 रोजी चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीदरम्यान सुपरस्टार रजनीकांत यांनी अटलबिहारी वाजपेयींची भेट घेतली होती.

24 नोव्हेंबर 2005मध्ये पाटणामध्ये शपथविधी समारंभावेळी एनडीए नेत्यांसोबत भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी 

भारताचे माजी पंतप्रधान व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी बंगळुरु येथे आयोजित करण्यात आलेल्या एका इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते.