परिणीती चोप्रा एन्जॉय करतीये अॅडव्हेंचर ट्रिप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 04:54 PM2018-02-08T16:54:15+5:302018-02-08T16:56:05+5:30

अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिचा आगामी चित्रपट 'केसरी'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच परिणीती अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

परिणीती सध्या मालदीवमध्ये सुट्ट्या घालवत असून तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत.

मला हे जॅकेट चोरी करायचं आहे अशी कॅप्शन परिणीतीने या फोटोला दिला आहे. पाच लाखांहून अधिक जणांनी हा फोटो लाईक केला आहे.

परिणीती मालदीवमध्ये अॅडव्हेंचर ट्रिप एन्जॉय करत आहे

परिणीतीच्या या फोटोला 7 लाखांहून अधिक जणांनी लाईक केलं आहे