PHOTOS : Next Station बनारस... PM मोदींची मध्यरात्री रेल्वे स्टेशनवर भ्रमंती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 08:49 AM2021-12-14T08:49:15+5:302021-12-14T09:16:08+5:30

मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन बनारस रेल्वे स्टेशनवरील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मोदींसमवेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही दिसत आहेत.

भारतात अनेक सल्तनती आल्या आणि गेल्या. अनेक आक्रमक आले आणि गेले. मात्र, पवित्र काशी या सर्वांना पुरून उरली.

या शहराचे महात्म्य आजही कायम आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव केला.

काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पाच लाख चौरस मीटर परिसरात विस्तारलेल्या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधानांच्या हस्ते सोमवारी थाटात उद्घाटन झाले.

वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर परिसराचा विकास करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प पंतप्रधान मोदी यांच्या मनात होता. त्याची स्वप्नपूर्ती सोमवारी झाली.

काशीतील कॉरिडोअरचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यरात्री बनारस स्टेशनला भेट दिली. यावेळी, स्टेशनवर मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन बनारस रेल्वे स्टेशनवरील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मोदींसमवेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही दिसत आहेत.

थंडीचे दिवस असल्याने मोदींनी मफलर आणि स्वेटर परिधान केल्याचे येथील फोटोमध्ये दिसून येत आहे

मध्यरात्री 1.13 मिनिटांनी मोदींनी योगींसह बनारस स्टेशनला भेट दिली. यावेळी, येथील परिसराची पाहणी करतानाच स्टेशनवरील व्यापाऱ्यांशी संवादही साधला

मोदींच्या बनारस स्टेशनवरील दौऱ्यामुळे येथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कमांडो आणि पोलीस फौजफाटा घेऊन मोदींनी स्टेशन परिसरात भ्रमंती केली

तत्पूर्वी मोदींनी भाजपच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांसाठीची रणनितीवरही चर्चा झाल्याचे समजते

मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व सुमारे तीन हजार निमंत्रित काशीतील कॉरिडोअरच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.