प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथवर संचलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 08:50 PM2018-01-04T20:50:34+5:302018-01-04T20:53:48+5:30

नवी दिल्ली : येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनासाठी लष्कराच्या विविध तुकड्यांमधील जवान सराव करत आहेत.

दरम्यान, राजधानी दिल्लीत थंडीचा कडाका जाणवत असून अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे.

यातच, नवी दिल्लीचा राजपथ परिसर सध्या जवानांच्या संचलन सरावामुळे बहरुन गेला आहे.

राजपथावर दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे भव्य संचलन पार पडते.

प्रजासत्ताक दिनाचे संचलन राजपथाच्या पश्चिमेकडील विजय चौकापासून लाल किल्ल्यापर्यंत जाते. संचलनाच्या सुरुवातीला पंतप्रधान देशाच्यावतीने अमर जवान ज्योती येथे शहीद जवानांना आदरांजली वाहतात.