मोदींचे 'जबरा' फॅन, एक चेहरे पे कही चेहरे लगा लेते है लोग...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:41 PM2019-04-22T17:41:40+5:302019-04-22T17:48:04+5:30

देहरादून येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत एक चहावाला चक्क मोदींचा मास्क तोंडाला लावूनच चहा विकत होता.

काही सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुखवटा परिधान करुन भाजपाचा झेंडाही फडकवताना एक समर्थक दिसत आहे.

जसे सचिन तेंडुलकरचे, विराट कोहली अन् धोनीचे फॅन आहेत, तसेच पंतप्रधान मोदींचेही भक्त आहेत. मोदींसाठी कायपण...

सध्या जिकडं तिकडं निवडणुकांची धामधूम सुरू आहे. या निवडणुकांच्या प्रचारासाठी अक्कल लावून अनेक शक्कल लढवल्या जात आहेत. आपल्या नेत्याच्या प्रचारासाठी जो-तो वाट्टेल ते करत आहे.

कमळाच फूल आणि फुलाची साडी परिधान करुन भाजपा समर्थक महिलांनी फोटोशूट केलं. हातात मोदींचा फोटो आहे हे विशेष

मोदीस्टाईलचा ट्रेंड केवळ प्रचारातच नाही तर कपड्यांच्या दुकानातही पाहायला मिळतो, मोदीजॅकेट म्हणजे फेमस..

हरहर मोदी घरघर मोदी... लहान चिमुकल्यालाही मोदींचा मुखवटा परिधान केल्याचं दिसत आहे.

हे भिंतीवर लटकवायचं घड्याळ आहे, पण या घड्याळाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचा काहही संबंध नाही.

कार्यकर्त्यांमध्ये मोदींच्या सभेसाठी वेगळाच जोश पाहायला मिळतो, कधी ढोलताशाच्या गजरात तर कधी मोदींच्या जयघोषात कार्यकर्तेऑफिसमध्येही मोदीमय वातावरण निर्माण करतात.