‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरने घेतली पंतप्रधानांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 09:53 PM2017-11-30T21:53:06+5:302017-11-30T21:57:43+5:30

नवी दिल्ली : अनेक देशांतील सौंदर्यवतींना मागे टाकत मिस वर्ल्डचा किताब मिळविणा-या मानुषी छिल्लर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

याचबरोबर, मानुषी छिल्लरने कुरुक्षेत्र येथे जाऊन हरयाणाचे मुख्यमंत्री एम.एल. खट्टर यांचीही भेट घेतली.

मुळची हरयाणाची मानुषी छिल्लर सध्या भारताचे नाव संपूर्ण जगात उज्वल करताना पाहायला मिळते.

गेल्या काही दिवसांपूर्वी चीनमधील सान्या येथे पार पडलेल्या मिस वर्ल्ड या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मानुषी छिल्लर हिला मिस वर्ल्ड होण्याचा मान मिळाला.

मानुषी छिल्लर 20 वर्षांची असून तिच्या आधी 2000 मध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता.

मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड बनल्यापासून बॉलिवूडचे अनेक दिग्दर्शक तिला आपल्या चित्रपटात घेण्याच्या तयारीत आहेत. अनेकांनी तिला ऑफर देखील पाठवण्यास सुरूवात केली आहे.