राजपथावर अवतरला शिवरायांचा चित्ररथ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 12:23 PM2018-01-26T12:23:51+5:302018-01-26T12:29:37+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राजपथावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा पाहायला मिळाला.

ज्या दिल्लीने छत्रपतींच्या स्वराज्याला कायम कमी लेखलं, ज्या दिल्लीश्वरांशी झगडण्यात शिवरायांचं आयुष्य खर्ची पडलं त्याच दिल्लीच्या मातीत अनेक राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या पराक्रमाची कीर्ती सांगणारा हा चित्ररथ दिमाखात अवतरला.

चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आलेली आहे.

या चित्ररथाची संकल्पना ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली आहे.