अभिनंदन यांच्यासोबत वाघा बॉर्डरवर आलेली 'ती' महिला कोण? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 04:13 PM2019-03-02T16:13:50+5:302019-03-02T16:19:16+5:30

आपल्या जबरदस्त कौशल्यानं मिग-21 मधून पाकिस्तानी हवाई दलाचं अत्याधुनिक एफ-16 विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन काल भारतात परतले. वाघा बॉर्डरवरुन मायदेशात परतताना अभिनंदन यांच्यासोबत एक महिला होती. ही महिला कोण, याची चर्चा बऱ्याच ठिकाणी सुरू होती.

अभिनंदन यांच्यासोबत असलेली महिला त्यांची पत्नी असल्याचा काहींचा समज होता. मात्र अभिनंदन यांनी सीमा ओलांडताच त्यांच्यासोबत आलेली महिला पुन्हा माघारी म्हणजेच पाकिस्तानात परतली.

सोशल मीडियावर चर्चेत राहिलेल्या या महिलेचं नाव डॉक्टर फरिहा बुगती आहे. त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात काम करतात.

परराष्ट्र मंत्रालयातील भारताशी संबंधित प्रकरणं बुगती हाताळतात. त्या एफएसपी अधिकारी आहेत. भारतात ज्या प्रमाणे आयएफएस अधिकारी असतात, त्या प्रमाणे पाकिस्तानात एफएसपी असतात.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणदेखील बुगती हाताळत आहेत.

गेल्या वर्षी कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीनं कुलभूषण यांची इस्लामाबादमध्ये भेट घेतली होती. त्यावेळीही बुगती तिथे उपस्थित होत्या.