येतीच्या रहस्यमय पावलांचे ठसे; लष्कराकडून नवे फोटो प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 03:12 PM2019-04-30T15:12:55+5:302019-04-30T15:20:28+5:30

माऊंट मकालू येथे बर्फाच्छादित भागात हिममानव असल्याचे रहस्यमयी पुरावे सापडले आहेत.

हिममानवाला येती असेही म्हणतात. या येतीचे पाय साधारण मानसापेक्षा मोठे आहेत. तसेच त्याच्या दोन पावलांमधील अंतरही मोठे आहे.

या रहस्यमयी पावलांच्या ठशांचा अभ्यास भारतीय सैन्यदल आणि शास्त्रज्ञ करत आहेत.

या ठशांचा आकार हा 32 इंच लांब आणि 15 इंच रुंद आहे.

लागमल खार्का समुद्रसपपाटीपासून 3500 मीटर उंचीवर आहे. या ठिकाणापासून मकालू येथील लष्कराचा तळ जवळच आहे.

9 एप्रिलला एका जवानांच्या पथकाला हे रहस्यमयी पावलांचे ठसे लांबवर उमटत गेल्याचे दिसले.

यामुळे पुन्हा एकदा हिममानव अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडले आहेत.