ज्ञानवापीमध्ये ASI ला नेमकं सापडलं काय? फोटोंमधून महत्त्वाची माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 07:58 PM2024-01-26T19:58:35+5:302024-01-26T20:02:59+5:30

Gyanvapi Mosque : अयोध्येत राम मंदिर उभं राहिल्यानंतर काही दिवसांतच वाराणसी मधील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत आला आहे. येथे पुरातत्त्व विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला असून, या अहवालानंतर मशीद बांधण्यासाठी मंदिराच्या स्तंभांचा वापर करण्यात आला असल्याचा दावा करण्यात येत आहे. आता ज्ञानवापीमधील फोटोही समोर आले आहेत.

अयोध्येत राम मंदिर उभं राहिल्यानंतर काही दिवसांतच वाराणसी मधील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत आला आहे. येथे पुरातत्त्व विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला असून, या अहवालानंतर मशीद बांधण्यासाठी मंदिराच्या स्तंभांचा वापर करण्यात आला असल्याचा दावा करण्यात येत आहे. आता ज्ञानवापीमधील फोटोही समोर आले आहेत.

पुरातत्त्व विभागाच्या अहवालामध्ये ज्ञानवापीमध्ये आधी हिंदू मंदिर होते, असे सांगण्यात येत आहे. ज्ञानवापीच्या खांबांवर हिंदू देवीदेवतांची प्रतीक चिन्ह मिळाली आहेत. ज्ञानवापीच्या खांबांवर पशु-पक्ष्यांची चिन्हंही सापडली आहेत. त्याबरोबरच एएसआयने आपल्या अहवालामध्ये येथील बांधकामाची पश्चिम भिंत ही हिंदू मंदिराचा उर्वरित भाग आहे, असाही दावा करण्यात आला आहे.

तसेच ज्ञानवापीमध्ये जी मशीद बांधण्यात आली आहे, ती बांधण्यासाटी हिंदू मंदिराच्या खांबांचा वापर करण्यात आला होता, असाही दावा एएसआयच्या अहवालात करण्यात आला आहे.

ज्ञानवापीच्या सर्व्हेमध्ये एएसआयनने जीपीआर तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. जीपीआर सर्व्हेनुसार ज्ञानवापीच्या उत्तर हॉलमध्ये एक विहीर असल्याचे दिसत आहे.

सध्याचं बांधकाम करण्यासाठी हिंदू मंदिराचे खांब आणि प्लॅस्टरचा वापर करण्यात आला आहे. पुरातत्त्व विभागाने आपल्या अहवालामध्ये इथे एक मोठं हिंदू मंदिर होतं, असं स्पष्टपणे लिहिलं आहे.

ज्ञानवापी परिसरामध्ये जे शिलालेख मिळाले आहेत, ते हिंदू मंदिर असल्याचे सर्वात मोठे पुरावे असल्याचे मानले जात आहे. एएसआयला संपूर्ण परिसरामध्ये असे तब्बल ३२ असे पुरावे दिसून आले आहेत ज्यामधून ज्ञानवापीचं धार्मिक स्वरूप हिंदू मंदिराचं असल्याचे दिसत आहे. म्हणजेच हिंदू मंदिराला तोडून इथे मशीर बांधण्यात आली होती. तसेच ही मशीद बांधण्यासाठी हिंदू मंदिराच्या अवशेषांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता.

पुरातत्त्व विभागाचा अहवाल पाहिल्यास त्यामधून ज्ञानवापीमधील शिलालेख हे देवनागरी, तेलुगू आणि कन्नड भाषेत कोरलेले आहेत. तसेच शिलालेखांवर जनार्दन, रुद्र आणि उमेश्वरा असं नाव लिहिलेलं आहे. त्याशिवाय शिलालेखावर महामंत्री मंडप यासारखे शब्दही लिहिलेले आहेत. ते महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. तसेच इथल्या सध्याच्या बांधकामाच्या जागी मंदिर होतं, हे स्पष्ट होत आहे.