काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा गुजरात दौरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 03:19 PM2017-09-27T15:19:02+5:302017-09-27T15:22:40+5:30

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरात दौ-याचा बुधवारी (27 सप्टेंबर) शेवटचा दिवस होता. या दौ-यादरम्यान राहुल गांधींनी अनेक सभा घेतल्या. यावेळी त्यांचा भक्तीमय रुपदेखील पाहायला मिळाले.

गुजरात दौ-यादरम्यान राहुल गांधींनी येथील अनेक मंदिराचे दर्शन घेतले

आपल्या दौ-याची सुरुवात राहुल गांधी यांनी द्वारकातील द्वारकाधीश मंदिरापासून केली. येथे त्यांनी पूजा-अर्चनादेखील केली.

राहुल गांधींनी यावेळी नवरात्रौत्सव मंडळात जाऊन नागरिकांची भेटही घेतली

राहुल गांधींनी येथील चामुंडा देवीच्या मंदिरालाही भेट दिली