बाबा राम रहीम प्रकरण, चंदीगडमध्ये तणाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 11:36 PM2017-08-24T23:36:07+5:302017-08-24T23:47:23+5:30

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमीत राम रहीम यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाच्या खटल्याचा निकाल शुक्रवारी लागणार आहे.

त्यांना शिक्षा झाल्यास त्यांच्या अनुयायांनी गोंधळ करू नये, यासाठी पंजाब व हरयाणा राज्यांनी तसेच चंदीगड प्रशासनाने कडक पावले उचलली आहे.

सिरसा, चंदीगड व पंचकुला या भागांना पोलीस छावण्यांचे रूप आले आहे.सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त असून, राखीव सशस्त्र पोलीस दलेही तैनात करण्यात आली आहे.

पंचकूलासह इतर अनेक भागांमध्ये डेरा समर्थकांची मोठी गर्दी उसळली आहे.

सिरसा, चंदीगड व पंचकुला या भागांना पोलीस छावण्यांचे रूप आले आहे.सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त असून, राखीव सशस्त्र पोलीस दलेही तैनात करण्यात आली आहे.