Ayodhya Deepotsav 2022: १७ लाख दिवे, ६०० किलो फुलं, ३६ घाटांवर सजावट... भव्य दीपोत्सवासाठी अयोध्या सज्ज! पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 08:10 PM2022-10-22T20:10:27+5:302022-10-22T20:25:10+5:30

योगी सरकारच्या काळात यंदाही अयोध्येत भव्य दिपोत्सव साजरा करण्यात येत आहे. पण यंदाचा दिपोत्सव वेगळा ठरणार आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील यावेळी उपस्थित असणार आहेत. दिपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री राम जन्मभूमी आणि भगवान रामलल्लाच्या जन्मस्थानावर यंदा अप्रतिम सौंदर्य पाहायला मिळणार आहे. दिपोत्सवात श्री राम जन्मभूमीवर फुलांची विशेष सजावट करण्यात आली आहे. देशासह परदेशातूनही आकर्षक फुलं सजावटीसाठी आयात करण्यात आली आहेत.

यंदाचा अयोध्येतील दिपोत्सव वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी सज्ज आहे. यंदा ३६ हून अधिक घाटांवर नव्या रेकॉर्डसाठी जवळपास १७ लाख दिवे तयार करण्यात आले आहेत.

स्वयंसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाचा हा पहिलाच दिपोत्सव आहे जिथं २२ हजाराहून अधिक स्वयंसेवक घाटांवरील दिव्यांची डिझाइन आणि प्लेसमेंटची तयारी करत आहेत.

सजावटीसाठी परराज्यातूनही कामगार बोलवण्यात आले आहेत आणि ते सलग काम करत आहेत. यात मथुरा, सीतापूर इत्यादी ठिकाणांहूनही विशेष कुशल कमगार बोलवण्यात आले आहेत.

रामलल्लाचं जन्मस्थान फुलांच्या सजावटीची जबाबदारी घेतलेल्या बाळकृष्ण सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान रामल्लाच्या जन्मस्थानाची सजावट करण्यासाठी परदेशातून फुलांची आयात करण्यात आली आहे.

फुलांचा वापर मंदिराची सजावट, गेट निर्मिती आणि रांगोळीत केला जाणार आहे.

रांगोळीसाठी वेगळी ६ क्विंटल फुलं मागवण्यात आली आहेत. यात पांढऱ्या, नीळ्या, पिवळ्या, जांभळ्या आणि हिरव्या पानांनी खास सजावट करण्यात येणार आहे.

राम मंदिराच्या सजावटीसाठी ४० क्विंटल गोंडा आणि २ हजार क्विंटल बंडल वापरण्यात येणार आहेत.

याशिवाय ऑर्किड, लिली, डेनिम, कार्नेसन सारख्या फुलांच्या प्रजाती कोलकाता, बंगळुरूहून मागवण्यात आल्या आहेत.

बाळकृष्ण सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार याआधीही त्यांनी श्री राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठेवेळीही फुलांच्या सजावटीचं त्यांनी काम केलं होतं.