200 कोटीच्या लग्नाची शान न्यारी, सेलिब्रिटींसह लावली सर्वांनीच हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 02:31 PM2019-06-22T14:31:07+5:302019-06-22T14:34:15+5:30

उत्तराखंडच्या औलीतील शाही विवाह चर्चेचा विषय बनला असून भारतीय मुळचे दक्षिण आफ्रिकाचे उद्योगपती गुप्ता बंधूंच्या मुलांचा विवाह सोहळा पार पडला आहे.

आफ्रिकाचे उद्योगपती गुप्ता बंधूंच्या मुलांचा विवाह सोहळा पार पडला आहे. तब्बल 200 कोटी रूपये खर्च करण्यात आलेल्या या लग्नात पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 5 कोटी रूपयांच्या परदेशी फुलांनी पाहुण्यांच्या स्वागतासाठी औलीला सजवण्यात आले आहे.

गुप्ता बंधुंनुसार त्यांना आपल्या मुलांचे लग्न इटलीमध्ये करायचे होते. पण उत्तराखंडला वेडिंग डेस्टिनेशन बनवण्याचा राज्य सरकारच्या उद्देश पाहता त्यांना यासाठी औलीची निवड केली.

100 ब्राह्मण गुप्ता बंधुंच्या दोन्ही मुलांचे लग्न पार पडलं आहे. अवधेशानंद महाराज यामध्ये मुख्य पुजारी होते. कथा वाचक रमेश भाई ओझा देखील याशिवाय आपली उपस्थिती लावली

कॅटरिना कॅफ, सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासह अनेकांनी गुप्ता यांच्या घरातील लग्न सोहळ्याला हजेरी लावली.

सध्या गुप्ता बंधुंच्या मुलांच्या विवाह समारंभाच्या तयारीमुळे समुद्रसपाटीपासून 9500 ते 10500 फूट उंचीवर स्थित विश्व प्रसिद्ध हिम क्रीडा केंद्र ओली चर्चेचा विषय ठरले आहे

टॅग्स :लग्नmarriage