साहेब, आपल्यामुळं खूप मोठी सोय झाली, 62 वर्षीय वृद्धाचे कलेक्टरला पत्र

By महेश गलांडे | Published: December 25, 2020 07:37 PM2020-12-25T19:37:42+5:302020-12-25T19:58:44+5:30

नंदूरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड हे आपल्या कामाप्रति अतिशय कर्तव्यदक्ष आणि सर्वसामान्यांची जाण असलेले अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकीक आहे. आपल्या कामातून ते नेहमीच प्रशासनातील प्रेरणादायी अधिकारी असल्याचं सिद्ध करतात.

भारूड हे सध्या नंदूरबार म्हणजेच आदिवासी बहुल लोकांच्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी बनून कार्यरत आहेत, ज्या मातीत, समाजात अतिशय खडतर परिश्रम राजेंद्र भारुड यांनी घेतलं, आज त्याच जिल्ह्यात ते जिल्हाधिकारी बनून काम करत आहेत.

भारुड यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल आणि संवेदनशीलतेबद्दल एका वृद्ध व्यक्तीने पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. भारुड यांनी आपल्या ट्विटर या सोशल मीडियावरुन हे पत्र शेअर केले आहेत.

भारुड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अपंग आणि वृद्ध व्यक्तींच्या सोयीसाठी लिफ्ट बसवली आहे, त्यामुळे 62 वर्षीय विजय पाटील यांनी पत्राद्वारे त्यांचे अभिनंदन आणि आभार मानले आहेत.

विजय पाटील यांच्या पत्राने कामासाठी आणखी ऊर्जा मिळते, लोकांची सेवा हेच आमचे कर्तव्य आहे, असे म्हणत जिल्हाधिकारी भारुड यांनी हे पत्र सोशल मीडियाव शेअर केल आहे.

साक्री तालुक्यातीला सामोडे गावात भिल्ल जमातीत राजेंद्र भारुड यांनी जन्म घेतला, जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच न करता त्यांनी आयएएस ऑफिसर्पयतची मजल गाठली.

सुरुवातील अक्कलकुवा तालुक्यातल्या नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. गावापासून 150 किमी दूर होती शाळा. पण, ही संधी अशी वाया जाऊ द्यायची नाही. संधीचं चीज करायचंच ठरवून त्यांनी शिक्षण घेतलं.

ते घरापासून दूर राहून शिकत होतो. मन लावून अभ्यास करत होतो. दहावीला उत्तम गुणांनी पास झालो. बारावीला 97 टक्के गुण मिळाले. आणि स्वतर्‍च्या गुणांच्या जोरावर मुंबईतील जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला.

ते वैद्यकीय शिक्षण घेत होतो; पण तरीही आईचा मोहाची दारू बनवण्याचा व्यवसाय चालूच होता. तो बंद केला असता तर मुलाला पैसे कसे पुरवता आले असते, असं त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं.

अतिशय संघर्षातून तावून सोलून निघालेलं डॉ.राजेंद्र भारुड नावाचे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व नव्या पिढीला मिळालंय. त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘मी एक स्वप्न पाहिले’ हे पुस्तक आजही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.