विठूचा गजर हरीनामाचा...

By admin | Published: July 14, 2015 12:00 AM2015-07-14T00:00:00+5:302015-07-14T00:00:00+5:30

पुणे जिल्ह्यातील खुटबाव येथील भैरवनाथ विद्यालयाच्या वतीने यंदा सलग १७ व्या वर्षी वारकरी भक्तांसाठी पिठले भाकरीची मेजवानी देण्यात आली. यवतमध्ये अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम व सर्व जाती-धर्मांतील नागरिक पहाटे पाचपासून हजारो भाक-या घरी बनवून श्री काळभैरवनाथ मंदिरात आणून देतात.

ज्ञानोबा-माऊलींच्या अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज नागमोडी वळणाचा चार कि.मी.चा अवघड दिवे घाट लीलया पार केला. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर रविवारी १२ जुलै रोजी रात्री पालखी सोहळा संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत दाखल झाला.

राज्यातील शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणा-या देवगड दिंडीचा पहिला रिंगण सोहळा नेवासा येथे शनिवारी ११ जुलै रोजी पार पडला.

संत सोपानकाका पालखीचे प्रस्थान :

टाळमृदंगाच्या निनादात व टाळ-चिपळ्यांच्या तालावर वारकरी मंत्रमुग्ध झाले. जगतगुरू संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोरमध्ये आला. त्यावेळी हजारो भाविकांनी सोहळय़ाचे स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांनी पालखी सोहळय़ावर फुलांचा वर्षाव केला.

दरवर्षी आषाढ आला की लाखोंच्या संख्येने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूराकडे चालू लागतात.

रामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषींची तपोभूमी वाल्हेनगरीत समाज आरतीमध्ये माऊलीचे विश्‍वरूपदर्शन अनुभवले

बेभान होऊन नाचणारे वारकरी.. डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन धावणार्‍या महिला आणि ज्ञानोबा माऊली-तुकाराम अशा जयघोषात वारी सुरु आहे.

लाल मातीची धूळ उडवीत वार्‍याला मागे सोडून वेगात धावणारे कृष्णवर्णीय अश्‍व ... त्याच्या टापाखालील माती उचलून मनोभावे कपाळाला लावणारे भाविक.. असे दृश्य तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे दुसरे गोल रिंगण पार पडताना दिसत होते.

ग्यानबा-तुकारामच्या टिपेला पोचलेल्या सूरात रिंगण सोहळ्याला आलेला पूर.. अशा भारलेल्या वातावरणात सोमवारी दुपारी इंदापूर येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दुसरे गोल रिंगण पार पडले. संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण निर्माण करणा-या वारीची ही एक झलक