Sanjay Raut: वेंदाता महाराष्ट्रातून गेला; शिवसेनेला जाणवतेय संजय राऊतांची उणीव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 03:32 PM2022-09-16T15:32:21+5:302022-09-16T15:55:47+5:30

Sanjay Raut: राज्यात सध्या वेदांता फॉक्सकॉन हा लाखो कोटींची गुंतवणूक आणि लाखांहून अधिक रोजगार निर्माण करणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राजकारण पेटले आहे. त्यावरुन, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.

राज्यात सध्या वेदांता फॉक्सकॉन हा लाखो कोटींची गुंतवणूक आणि लाखांहून अधिक रोजगार निर्माण करणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राजकारण पेटले आहे. त्यावरुन, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.

सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेते आरोप करत आहेत. त्यावरुन, हे सरकार केंद्राच्या हातचं बाहुलं झालंय, अशीही टिका होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही शिंदे सरकारला फटकारलं आहे.

वेंदांचा मुद्दा विरोधकांची चांगलाच लावून धरला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरुन राजकारण पेटलं असताना शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांना फायर ब्रँड नेते संजय राऊत यांची उवीण भासत आहे. तसेच, संजय राऊत हे सातत्याने मोदी सरकावर मुंबई, महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत.

शिवसेनेतील उपनेते रघुनाथ कुचिक यांनी ट्विट करुन संजय राऊत यांची उणीव आज भासत असल्याचं म्हटलं. तसेच, राऊत यांनी केलेलं विधानही आज खरं होत असल्याचं ते म्हणाले.

साहेब, तुम्ही ईडी कार्यालयात जाताना म्हणाला होतात. पेढे वाटा, महाराष्ट्र कमजोर होतोय, आणि म्हणूनच महाराष्ट्र तुम्हाला मिस करतोय. कारण, आता महाराष्ट्राचे उद्योगधंदे आता गुजरातला पळवले जात आहेत. अशा वेळी सकाळ-संध्याकाळी तुमचा कडक आवाजातला होणारा विरोध खूप महत्त्वाचा होता, असे कुचिक यांनी म्हटलंय.

दरम्यान, गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊतांनी या वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी कोणतंही भाष्य केलेलं नाही.

मात्र तरीही सध्या सोशल मीडियावर त्यांच्याच एका विधानाची चर्चा आहे. पोलिसांनी जेव्हा राऊतांना अटक केली आणि पोलीस त्यांना घेऊन जात होते. तेव्हा जाताजाता संजय राऊतांनी एक विधान केलं होतं की, "पेढे वाटा पेढे, महाराष्ट्र कमकुवत होतोय." याच विधानाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

शिवसेनेच्या अनेक समर्थकांनी तसंच अनेक सोशल मीडिया युजर्सनी संजय राऊतांचा तो व्हिडीओ व्हायरल केला आहे. काही जणांनी ट्वीट करत संजय राऊतांचं हे विधान शेअर केलं आहे.

संजय राऊत हे दररोज सकाळी विरोधकांवर आगपाखड करत होते. आपल्या शैलीत ते विरोधकांवर निशाणा साधत टिका करायचे. त्यावेळी, त्यांच्या प्रामुख्याने टिका केंद्र सरकार आणि मोदी-शहांवर असायची. त्यामुळे, आज शिवसेनेला त्यांनी मोठी उणीव भासत आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम पत्रकार परिषद घेऊन वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचे सांगितले. त्यानंतर, विरोधकांनीही शिंदे सरकारवर टिकेची झोड उठवली. तसेच, हा प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.