मावळतीच्या सोनेरी किरणांनी अंबाबाई उजळून निघाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 12:12 PM2020-01-31T12:12:30+5:302020-01-31T13:03:10+5:30

अंबाबाईच्या मंदिरात काल सायंकाळी मावळतीच्या सुर्यकिरणांनी हजेरी लावली.

कोल्हापूरच्या श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवात गुरुवारी मावळतीच्या सोनेरी किरणांनी देवीची मूर्ती उजळून निघाली. पूर्ण क्षमतेने झालेल्या या किरणोत्सवात सूर्यकिरणे देवीच्या चेहऱ्यावर जाऊन लुप्त झाली. महाद्वारातून गाभाऱ्यात आलेली सूर्यकिरणे. सर्व छाया : आदित्य वेल्हाळ

६ वाजून १४ मिनिटे-सूर्यकिरणांनी केलेला चरणस्पर्श .

६ वाजून १५ मिनिटे - अंबाबाईच्या कमरेपर्यंत आलेली सूर्य किरणे.

६ वाजून १६ मिनिटे - अंबाबाईच्या गळ्यापर्यंत आलेली सूर्य किरणे.

सूर्यकिरणे अंबाबाई देवीच्या चेहऱ्यावर आलेली सूर्य किरणे.

चेहऱ्यावरून किरिटावर किरणे लुप्त झाली.