दुबईत 'या' गोष्टी कराल तर पडेल भारी; घडेल तुरुंगवारी....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 08:28 PM2018-08-03T20:28:00+5:302018-08-03T20:38:14+5:30

महिलांनी पुरुषांसारखे आणि पुरुषांनी महिलांसारखे कपडे परिधान केल्यास दुबईत तुरुंगवारी घडू शकते. कारण दुबईमध्ये रुढी परंपरा पाळल्या जातात.

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यास तुमची रवानगी थेट तुरुंगात होईल किंवा जबर दंड भरावा लागेल. घरी किंवा बारमध्येच तुम्ही मद्यपान करु शकता.

तुमच्याकडे अंमली पदार्थ आढळून आल्यास आजन्म तुरुंगवास घडू शकतो.

सार्वजनिक ठिकाणी मिठी मारल्यासही दुबईत तुरुंगाची हवा खावी लागू शकते.

सार्वजनिक ठिकाणी नाचण्यासही दुबईत बंदी आहे. असं केल्यास दंड आकारला जातो.