शास्त्रज्ञांना उत्तर ध्रुवावर सापडले नवीन बेट, फोटो पाहून व्हाल चकीत...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 06:04 PM2021-09-02T18:04:32+5:302021-09-02T18:12:23+5:30

New Islnad in North Pole: उत्तर ध्रुवातील समुद्रात हे नवीन बेट सापडले आहे.

कोपनहेगन: शास्त्रज्ञांना उत्तर ध्रुवाजवळील समुद्रात नवीन बेटाचा शोध लागला आहे. या नवीन तुकड्याला जगातील सर्वात उत्तरेकडील टोक असे म्हटले जात आहे.

उत्तर ध्रुवाजवळ समुद्रात सापडलेल्या या तुकड्याचा आकार फुटबॉल मैदानाइतका मोठा आहे. त्याला उत्तर ध्रुवावरील जमिनीचे शेवटचे टोक असे म्हटले जात आहे.

लाइव्ह सायन्सच्या अहवालानुसार, मार्टिन राश यांच्या नेतृत्वाखाली डॅनिश शास्त्रज्ञांची एक टीम हिमनद्या आणि वाढत्या तापमानाचा अभ्यास करण्यासाठी ओओडाक बेटावर गेली होती.

हे बेट ग्रीनलँडच्या उत्तर भागात आहे. यावेळी शास्त्रज्ञांनां नकाशा नसलेले एक बेट आढळले. शास्त्रज्ञांनी जीपीएसच्या सहाय्याने लोकेशनचा शोध घेतला असता हे बेट नवीन असल्याचे समजले.

रिपोर्टनुसार, हे नवीन बेट ओडाक बेटाच्या 2560 उत्तरेस फूट आहे. या बेटाची रुंदी 98 आणि लांबी 197 फूट लांब असून, फुटबॉल मैदानाच्या बरोबरीनं याचा आकार आहे.

हे बेट समुद्रसपाटीपासून 10 ते 13 फूट उंचीवर असून, बेटावर समुद्राची माती, मोरेन, चिकणमाती, हिमनद्यांनी सोडलेले दगड आहेत.

वादळामुळे हे नवीन बेट तयार झालं असावं, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या या बेटाबद्दल काही ठोस माहिती मिळाली नाही.

Read in English