कोलकात्यात इंटरनॅशनल पपेट फेस्टिव्हल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 03:03 PM2017-10-27T15:03:09+5:302017-10-27T15:07:13+5:30

कोलकात्यामध्ये गुरूवारपासून (27 ऑक्टोबर) इंटरनॅशनल पपटे फेस्टिव्हलला सुरूवात झाली आहे. गुरूवारपासून सहा दिवस हा फेस्टिव्हल सुरू राहणार आहे.

इंटरनॅशनल पपेट फेस्टिव्हलमध्ये युके, जर्मनी, पोर्तुगाल, इटली, ब्राझिल, सिंगापूरसह इतर अनेक देशातून आलेल्या पपेटिअर्सनी सहभाग घेतला आहे.

पपेट शोच्या माध्यमातून विविध देशातील संस्कृतीचं सादरीकरण केलं जातं आहे.

पपेट आर्टबद्दल भारतातील लोकांमध्ये रस निर्माण करण्यासाठी या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.