हातावरील मेहंदीवर नवऱ्याच्याऐवजी काढलं लाडक्या कुत्र्याचं चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 02:47 PM2018-02-15T14:47:14+5:302018-02-15T14:48:21+5:30

एक अशी नववधु आहे तिने तिच्या हातावरील मेहंदीत नवऱ्याचा चेहरा काढण्याऐवजी तिच्या लाडक्या कुत्र्याचा चेहरा काढून घेतला.

जास्मिन संधू असं या नवविवाहितेचं नाव असून तिचं रिकी गील याच्याशी लग्न झालं.

मेहंदीच्या दिवशी तिने मेहंदी आर्टिस्टला पतीचं नाव किंवा चेहरा काढायला न सांगता 'टॉबी' या तिच्या कुत्र्याचं कॅरीकेचर काढायला लावलं.

मेहंदी आर्टिस्ट प्रशंताने दोन्ही हातावर एक-एक कुत्र्याचं चित्र काढलं. एका हातावर फक्त कुत्र्याचा चेहरा व दुसऱ्या हातावर लग्नाच्या तारखेची पाटी हातात धरलेलं कुत्र्याचं चित्र काढलं.