असावा सुंदर चॉकलेटचा बंगला! हे आहे चॉकलेटपासून बनवलेले घर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 03:41 PM2018-10-06T15:41:13+5:302018-10-06T15:53:03+5:30

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे गाणं तुम्ही ऐकलं, गायलं असेल. पण या गीतातील बंगल्याप्रमाणे खरोखरचा चॉकलेटचा बंगला फ्रान्समध्ये तयार करण्यात आला आहे.

लांबून पाहिल्यावर हा बंगला लाकडाचा असल्यासारखं वाटतं. मात्र जवळून सुवास घेतल्यावर हा खरोखरच चॉकलेटपासून बनवलेला बंगला असल्याची प्रचिती येते.

या बंगल्यामधील सर्वच वस्तू या विविध प्रकारच्या चॉकलेटपासून बनवण्यात आल्या आहेत.

या चॉकलेटच्या बंगल्यातील कलाकुसर केलेल्या सुंदर वस्तू.

200 स्क्वेअर फुटांच्या या बंगल्याच्या निर्मितीसाठी दीड टन चॉकलेट वापरण्यात आले आहे.

आर्टिसन चॉकलेटियर जेन-लुक डीक्लूजेऊ यांनी हा बंगला डिझाइन केला आहे.