“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 02:25 PM2024-04-29T14:25:41+5:302024-04-29T14:25:49+5:30

BJP Chandrashekhar Bawankule News: सत्ता गेल्यानंतर केवळ मते मिळवण्यासाठी तुम्हाला कोकणवासीयांची आठवण झाली, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

bjp chandrashekhar bawankule replied uddhav thackeray criticism on pm modi in lok sabha election 2024 | “औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका

“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका

BJP Chandrashekhar Bawankule News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप तीव्र होत आहेत. प्रचारसभांतून केलेल्या टीकेवर पलटवार करण्यात येत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते दावे-प्रतिदावे करताना दिसत आहेत. यातच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर एक पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी कोकणात केली. मला त्यांना सांगायचे आहे की, औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले. हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगले पण तुम्ही आता राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहात, या शब्दांत बावनकुळे यांनी पलटवार केला.

सत्ता गेल्यानंतर तुम्हाला कोकणवासीयांची आठवण झाली

सत्ता गेल्यानंतर तुम्हाला कोकणवासीयांची आठवण झाली. अडीच वर्षे सत्तेच्या काळात कोकणला दमडीही दिली नाही. उलट चांगल्या प्रकल्पांना विरोध केला आणि ही देवभूमी विकासापासून वंचित ठेवली. आता फक्त मते मिळविण्यासाठी तुम्हाला कोकणची आठवण झाली. कोकण वादळात सापडले तेव्हा तुम्ही घरात बसून होतात तर देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे कोकणात लोकांना आधार देत होते. महापूर आला तेव्हा तुमच्या लोकांनी केलेली गुंडगिरी कोकणी माणूस विसरला नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि नारायण राणे यांच्या प्रयत्नातून कोकणचा विकास होतो आहे. आता तुम्ही कितीही थापा मारल्या तरी कोकणी माणूस तुमच्या खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
 

Web Title: bjp chandrashekhar bawankule replied uddhav thackeray criticism on pm modi in lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.