जगातल्या 'या' भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 11:00 PM2018-04-25T23:00:09+5:302018-04-25T23:00:09+5:30

ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगात अनेक समस्या निर्माण झाल्या, असं तुम्ही ऐकलं असेल. मात्र भारत आणि बांगलादेशमधील जमिनीचा वाद ग्लोबल वॉर्मिंगमुळे संपुष्टात आला. दक्षिण तलपट्टी हे बेट कोणाचं, यावरुन भारत आणि बांगलादेशमध्ये वाद होता. मात्र ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाण्याची पातळी वाढली आणि हे बेट पाण्याखाली गेलं. त्यामुळे दोन देशांमधला वाद संपला.

साओ पावलोजवळ असलेलं 110 एकरचं बेट सापांचं बेट म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी दर 6 चौरस यार्डामागे एक साप आढळून येतो. त्यामुळे हे बेट जगातलं सर्वात धोकादायक बेट समजलं जातं.

महिला आणि शॉपिंग हे समीकरण संपूर्ण जगभरात पाहायला मिळतं. जगभरातील महिलांचं उत्पन्न आणि त्यांचा खर्च यांच्या आकडेवारीवरुन हे सिद्धही झालंय. जगभरातील महिलांचं वार्षिक उत्पन्न 18 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकं आहे. तर त्यांचा खर्च 28 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकं आहे.

लास वेगासमधील कसिनोंमध्ये घड्याळंच नाहीत. या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना वेळेचा विसर पडावा. त्यांनी या ठिकाणी तासनतास खेळत राहावं, यासाठी घड्याळं लावण्यात आलेली नाहीत.

तैवानमधील एका रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ टॉयलेटच्या आकाराच्या भांड्यातून दिले जातात.