Ukraine Russia War: 'Miss Ukrain नेही घेतलं शस्त्र हाती, देशाच्या लढाईत पुढे सरसावली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 07:54 PM2022-02-27T19:54:25+5:302022-02-27T20:16:53+5:30

अनास्तासियाचे इंस्टाग्राम पर 75,000 फॉलोवर्स आहेत. ती सोशल मीडिया वर सातत्याने एक्टिव असते. त्यामुळेच, तिचा हा फोटो काही तासांतच जगभर व्हायरल झाला आहे.

रशियाने युक्रेनवर कब्जा केल्यानंतर आता मागे न हटण्याचा निर्धार करत युक्रेनचे राष्ट्रपतीही युद्धाला सामोरे जात मैदानात उतरले आहेत. त्यानंतर, आता तेथील महिलांनीही देश वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

युक्रेनमधील प्रसिद्ध व्यक्ती आणि महिलांही हाी बंदुक घेऊन युद्धाच्या मैदानात उतरल्या आहेत. येथील माजी मिस युक्रेन अनस्तसिया लेन्नानेही बंदुक हाती घेतली आहे.

सन 2015 मध्ये मिस युक्रेनचा खिताब जिंकणाऱ्या अनस्तसिया लेन्नाच्या हातात बंदुक असलेला एक फोटो समोर आला आहे. लेन्ना ही रशियापासून आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सैन्यात दाखल झाली आहे.

लेन्नाने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. आपण, आपल्या घराच्या संरक्षणासाठी हे बंदुक हाती घेतल्याचं तिनं म्हटलं आहे.

कब्जा मिळविण्याच्या हेतुने जो कोणी युक्रेन सीमारेषेच्या आत येईल, तो ठार मारला जाईल, असे कॅप्शनही लेन्नाने या फोटोला दिले आहे. तसेच, लेन्नाने नाटोला टोलाही लगावला आहे.

युक्रेनचं सैन्य सध्या ज्या गतीने लढत आहे ते पाहता, नाटोनेच युक्रेनमध्ये सहभागी व्हायला हवे, असे मजेशीर कॅप्शनही तिने दिले आहे.

युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर जेलेंस्की यांना प्रामाणिक शक्तीशाली नेता असे संबोधत त्यांचा सैनिकांसमवेत चालत असतानाचा फोटोही शेअर केला आहे.

अनास्तासियाचे इंस्टाग्राम पर 75,000 फॉलोवर्स आहेत. ती सोशल मीडिया वर सातत्याने एक्टिव असते. त्यामुळेच, तिचा हा फोटो काही तासांतच जगभर व्हायरल झाला आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची धग सातत्याने वाढताना दिसत आहे. आज युद्धाचा चौथा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये तुर्तासतरी तोडगा निघेल, असे वाटत नाही.

राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विटर अकाऊंटवरुन माजी युक्रेन सुंदरीचा फोटो शेअर केला आहे. युक्रेन लष्करात महिलांची संख्या लक्षणीय आहे, असेही त्यांनी म्हटलंय.