उत्तर कोरियाने सेलिब्रेट केलं क्षेपणास्त्र चाचणीचं यश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 07:33 PM2017-12-02T19:33:41+5:302017-12-02T19:35:24+5:30

उत्तर कोरियामध्ये सध्या वॉसाँग-15 या नव्या क्षेपणास्त्राचा कौतुक सोहळा सुरु आहे. उत्तर कोरियाच्या किम संग चौकात शुक्रवारी वॉसाँग-15 क्षेपणास्त्र चाचणीच्या यशाचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आले.

उत्तर कोरियातील सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र असलेल्या रोडाँग सिनमन या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर या सेलिब्रेशनचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते.

किम संग चौकात जमलेल्या नागरीकांची नाचगाणी एकूणच आंनदोत्सव सुरु होता.

वॉसाँग-15 च्या यशस्वी चाचणीने उत्तर कोरियाची महानता आणि ताकत संपूर्ण जगाला कळली असा संदेश एका फलकावर लिहिलेला होता. वॉसाँग-15 हे एक दीर्घ पल्ल्याचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. आता संपूर्ण अमेरिका आपल्या क्षेपणास्त्रांच्या रेंजमध्ये आली असून अण्वस्त्र हल्ला करु शकतो असा उत्तर कोरियाने दावा केला आहे.

सेलिब्रेशन सोहळयाला हुकूमशहा किम जोंग अनुपस्थित होता, पण लष्कर आणि पक्षाचे नेते उपस्थित होते.