Corona Virus : "चीनच्या लॅबमधूनच लीक झाला होता कोरोना पण..."; नव्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 11:55 AM2023-02-27T11:55:46+5:302023-02-27T12:12:01+5:30

China Corona Virus : कोरोना व्हायरसची उत्पत्ती चीनमधील एका प्रयोगशाळेतून झाल्याचे अनेक दिवसांपासून सांगितले जात आहे. मात्र आता याबाबत अमेरिकेच्या एका नव्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसची उत्पत्ती चीनमधील एका प्रयोगशाळेतून झाल्याचे अनेक दिवसांपासून सांगितले जात आहे. मात्र आता याबाबत अमेरिकेच्या एका नव्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, 2021 च्या ऊर्जा विभागाच्या अभ्यासात असे म्हटले आहे की व्हायरसची उत्पत्ती बहुधा चीनच्या प्रयोगशाळेतून झाली आहे. तथापि, तो प्रोग्रामचा भाग नसल्याचे म्हटले आहे. म्हणजेच हा व्हायरस शस्त्र बनवण्यासाठी वापरला जात नव्हता.

नॅशनल इंटेलिजेंस डायरेक्टर एव्हरिल हेन्स यांच्या कार्यालयातून ही माहिती समोर आली आहे, असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. काही गोष्टी या व्हायरसच्या उदयाशी जोडलेल्या होत्या. चीनच्या वुहान लॅबमधून हा व्हायरस लीक झाल्याचे अमेरिका सुरुवातीपासून म्हणत आहे.

एजन्सीने म्हटले आहे की, त्यांचा रिपोर्ट 'कमी आत्मविश्वासाने' जारी केला जात आहे. ऊर्जा विभाग 17 यूएस प्रयोगशाळांच्या नेटवर्कवर देखरेख करतो, ज्यामध्ये जीवशास्त्र क्षेत्राचा समावेश आहे. कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीबाबत दोन परस्परविरोधी सिद्धांत आहेत.

एक म्हणजे ते अज्ञात प्राण्यापासून मानवापर्यंत पोहोचले आणि दुसरे म्हणजे ते चीनच्या वुहानमधील संशोधन प्रयोगशाळेतून बाहेर पडले. चीनमध्ये कोरोना व्हायरस पहिल्यांदाच आढळून आला आहे. यानंतर, 2020 च्या सुरूवातीस, तो जवळजवळ जगभरात पसरला होता.

WHO च्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरसमुळे जगात आतापर्यंत 70 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे जगभरात पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या मुद्द्याचा राजकीय वापर केला. त्यांनी जगभरातील कोरोना व्हायरसला चायना व्हायरस असे संबोधले.

उर्जा विभागाचे अहवाल इतर चार अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या अहवालांशी भिन्न आहेत. या दोन संस्थांनी असा निष्कर्ष काढला की संसर्ग झालेल्या प्राण्यापासून साथीचा रोग निसर्गात पसरला. त्याच वेळी, दोन्ही एजन्सी कोणत्याही निर्णयावर पोहोचल्या नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली. अनेकांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली. आताही काही ठिकाणी व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत.