किम जोंग उन - शी जिनपिंग यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 01:50 PM2018-03-28T13:50:24+5:302018-03-28T13:50:24+5:30

बीजिंग : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची मंगळवारी (27 मार्च) बीजिंग येथे भेट घेतली.

चीन सरकारची अधिकृत वृत्तसंस्था असलेल्या 'शिन्हुआ'नं उत्तर कोरिया व चीनच्या शिष्ठमंडळादरम्यान झालेल्या चर्चेचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहेत.

उत्तर कोरियासोबत विभिन्न माध्यामांद्वारे संपर्क वाढवण्याची इच्छादेखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सांगितले की, बदललेल्या या परिस्थितींमध्ये उत्तर कोरियाशी नियमित स्वरुपातील संपर्क ठेवणार आहे.

तसेच, उत्तर कोरियासोबत विभिन्न माध्यामांद्वारे संपर्क वाढवण्याची इच्छादेखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

टॅग्स :चीनchina