या देशासाठी भारतीय नौदल बनलं देवदूत, 192 जणांचे प्राण वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 04:04 PM2019-03-25T16:04:00+5:302019-03-25T16:08:27+5:30

भारतीय नौदलाचे जवान फक्त भारताच्या सीमेचं रक्षण करत नाही तर आपल्या देशापासून खूप किलोमीटर अंतरावर जाऊन आपल्या धाडसाचं उदाहरण दाखवून दिलंय, मोझांबिक या ठिकाणी आलेल्या चक्रीवादळाचा सामना करत तेथील पूरात अडकलेल्या नागरिकांची मदत नौदलाच्या जवानांनी केली आहे.

सीमा असो अथवा हवाई किंवा समुद्र मार्ग देशाच्या रक्षणासाठी लष्कर नेहमीच एक पाऊल पुढे असते. पण केवळ देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी नाही तर एखाद्या नैसर्गिक आपत्तीवेळी देखील भारतीय जवान आघाडीवर असतात

आफ्रिका खंडातील मोझांबिक देश चक्रीवादळामुळे मोठ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देत आहे. संकटात सापडलेल्या मोझांबिकच्या मदतीला भारतीय नौदल धावून गेले. चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या मोझांबिकमधील अनेक भागात अडकलेल्या लोकांना भारतीय नौदलाने वाचवले

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मोझांबिक येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी भारताने मदत म्हणून नौदलाच्या तीन बोटी बीरा बंदरगाह याठिकाणी पाठवल्या आहेत. या पूरामध्ये अडकलेल्या अनेक जणांना वाचविण्यासाठी भारतीय जवान प्रयत्न करत आहेत.

मोझांबिक येथे आलेल्या पूरामध्ये अनेक लोक अडकलेले आहे. याठिकाणी भारतीय नौदलाने 192 जणांचे प्राण वाचवत त्यांना सुरक्षित स्थळी पोहचवलं आहे. तसेच भारताने उभारलेल्या आरोग्य केंद्रावर 1382 जणांवर उपचार करण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली

एवढचं नव्हे तर या पूरात अडकलेल्या 36 भारतीयांना सुखरुप वाचविण्यात भारतीय नौदलाला यश आलंय, पूरामुळे सर्वाधिक मृत्यू बीरा शहरात झालेल्या आहेत. या पूरामुळे येथील दळव-वळणही बंद झालंय, रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक बंद आहे तर विमानसेवाही बंद करण्यात आल्या आहेत.