वा-याशी स्पर्धा करणा-या जगातील 5 सर्वाधिक वेगवान बुलेट ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 11:22 AM2017-09-14T11:22:04+5:302017-09-14T12:29:44+5:30

चीनमधील हार्मनी सीआरएच 380ए या ट्रेनचा 486 किमी प्रतितास इतका वेग आहे. पण सामान्यतः ही ट्रेन 380 किमी प्रतितास वेगाने धावते.

शांघाय मधील ट्रान्सरॅपिड जगातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. जपानी ट्रेनप्रमाणे मॅग्नेटिक लॅव्हिटेशनवर आधारित या ट्रेनचा 430 किमी प्रतितास इतका वेग आहे.

फ्रान्समधील टीजीव्ही ही सर्वात वेगवान ट्रेन आहे. सामान्यतः या ट्रेनचा स्पीड 320 किमी प्रतितास इतका असतो. पण 2007 मध्ये या ट्रेनचा 574 किमी प्रतितास इतका स्पीड नोंदवण्यात आला आहे.

जर्मनीची आयसीई ही ट्रेन सामान्यतः 250 किमी वेगाने धावते. पण 1988 मध्ये 406 किमी प्रतितास या वेगाने ही ट्रेन धावली होती.

स्पेनमध्ये 2007 साली ही ट्रेन पहिल्यांदा रेल्वे ट्रॅकवर धावली होती. 403.7 किमी प्रतितास इतका या ट्रेनचा स्पीड आहे.