कंबोडियातील अंगकोरवट येथे सापडले प्राचीन मुर्तीचे अवशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:06 PM2017-08-01T16:06:24+5:302017-08-01T16:09:03+5:30

कंबोडियातल्या अंगकोरवट मंदीराच्या परीसरात पुरातत्व विभागाचं उत्खनन सुरू असून काही मुर्त्यांचे अवशेष मिळाले आहेत.

अंगकोर ही खमेर साम्राज्याची इसवी सनाचे नववे ते 15वे शतक या काळातली राजधानी होती.

अंगकोर हे त्यावेळचं खूप मोठं शहर होतं आणि जागतिक लोकसंख्येच्या 0.1 टक्के जनता या शहरात रहात होती.

संस्कृतमधल्या नगर या शब्दावरून अंगकोर हे नाव पडलं असून खमेर साम्राज्य हिंदू राजा जयरामन द्वितीय यानं ते स्थापन केलं होतं.