'या' सात गोष्टींमुळे वाढतो कॅन्सर होण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 04:58 PM2018-07-04T16:58:09+5:302018-07-04T17:35:39+5:30

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आपल्याला हाय ग्रेड कॅन्सर हा आजार झाल्याचे ट्वीट करुन सर्वांना आजाराबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कॅन्सरची चर्चा होऊ लागली आहे. कोणकोणत्या गोष्टींमुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो ते जाणून घेऊया.

सिगारेट आणि तंबाखूचे सेवन करणं हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असतं. यामुळे मोठ्या प्रमाणात लंग कॅन्सरचा धोका निर्माण होतो. धुम्रपान केल्यामुळे गळा, तोंड, किडनी, पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका असतो.

सूर्याच्या अतिनील (UV) किरणांमुळे त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका असतो.

व्हायरस आणि संसर्गामुळेही कॅन्सर होण्याचा धोका संभवतो.

प्रक्रिया केलेल्या मांसचे सेवन केल्यास कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

फिजिकली अॅक्टीव्ह लोकांना कॅन्सरचा धोका कमी असतो. त्यामुळेच व्यायाम न केल्यास कॅन्सरचा धोका संभवतो.

दारुच्या अतिसेवनाने कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

लठ्ठपणामुळे 13 प्रकारचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. लठ्ठपणा आणि बैठी सुस्त जीवनशैली यांचा कॅन्सरशी निकटचा संबंध आढळून आला आहे.

काही वेळा कॅन्सर अनुवंशिक पण असू शकतो.