ऑनलाईन औषधं खरेदी करताय?; मग 'या' गोष्टी नक्की ठेवा लक्षात अन्यथा बसेल मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 04:44 PM2022-09-09T16:44:01+5:302022-09-09T16:50:23+5:30

Tips to order online medicine: ऑनलाईन औषधं खरेदी करण्यासाठी काही खास टिप्स, कशी काळजी घ्यायची हे जाणून घेऊया...

देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. असं असतानाच अनेक आजारांनी देखील आता डोकं वर काढलं आहे. आजारावर औषध गुणकारी ठरतं. औषध घेण्यासाठी लोक अनेकदा मेडिकल स्टोअरमध्ये जातात. काहीवेळा औषध उपलब्ध नसल्याने अनेकांना वेगवेगळ्या मेडिकल स्टोअर्सच्या फेऱ्या माराव्या लागतात.

आजकाल बहुतांश लोक घरबसल्या ऑनलाईन औषधं ऑर्डर करण्यास अधिक प्राधान्य देतात. अर्थातच ऑनलाईन औषध खरेदी करणे खूप सोपे आहे. पण ऑनलाईन औषध मागवताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन औषधं खरेदी करण्यासाठी काही खास टिप्स, कशी काळजी घ्यायची हे जाणून घेऊया...

औषधे खरेदी करण्यासाठी कोणतीही माहीत नसलेली वेबसाईट अजिबात निवडू नका. या प्रकरणात, फसवणूक होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे ऑनलाईन औषध घेताना विश्वासार्ह वेबसाईट निवडणे केव्हाही चांगले. (Image/Canva)

ऑनलाईन औषध घेताना, कस्टमर केअरशी बोलायला विसरू नका. औषध ऑर्डर करण्यापूर्वी कस्टमर केअरला फोन करून औषधाशी संबंधित माहिती मिळवा, त्यानंतरच ते खरेदी करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चॅटबॉक्सच्या माध्यमातून कस्टमर केअरशीही बोलू शकता. (Image/Canva)

ऑनलाईन औषध ऑर्डर केल्यानंतर, थेट औषधे घेणे टाळा. ही औषधे वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सूचनेनुसारच औषधे घ्या. कोणतीही औषधे स्वत:हून घेणं टाळा (Image/Canva)

ऑनलाईन ऑर्डर दरम्यान औषधे कधीकधी बदलली जातात. अशा परिस्थितीत, औषधे थेट घेण्यापूर्वी, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणि औषधाचे प्रिस्क्रिप्शन नीट चेक करा आणि तेच औषध आहे की नाही हे पाहूनच घ्या (Image/Canva)

ऑनलाईन औषध मागवल्यानंतर खात्रीशीर बिलही घ्या. याच्या मदतीने तुम्ही औषधं चेक करू शकता. तसेच तुमच्याकडे चुकीचे औषध असल्यास त्याबाबत दावाही करू शकता. त्यामुळे औषधासोबतच डिलिव्हरी करणार्‍या व्यक्तीकडून खात्रीपूर्वक बिल मागवा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Image/Canva)