हार्बर रेल्वे हळूहळू पूर्वपदावर! लोकल रुळावरुन घसल्यानं घडलेली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 12:47 PM2024-04-29T12:47:31+5:302024-04-29T12:48:37+5:30

Mumbai local Harbour line services are disrupted after a coach of a suburban local derailed while entering the platform at CSMT : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेच्या हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Mumbai local Harbour line services are disrupted after a coach of a suburban local derailed while entering the platform at CSMT | हार्बर रेल्वे हळूहळू पूर्वपदावर! लोकल रुळावरुन घसल्यानं घडलेली दुर्घटना

हार्बर रेल्वे हळूहळू पूर्वपदावर! लोकल रुळावरुन घसल्यानं घडलेली दुर्घटना

मुंबई-

Mumbai Local News : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेच्या हार्बर मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक आता हळूहळू पर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. दुपारी १२ वाजताच्या सुमारास पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलचा डबा सीएसएमटी स्थानकाजवळ घसरला होता. यामुळे हार्बर रेल्वेची सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. सीएसएमटीच्या दिशेनं येणाऱ्या लोकल वेगवेगळ्या स्थानकांमध्येच बराच काळ रखडून होत्या. यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली होती.

मध्य रेल्वेच्या आपत्कालीन विभागाकडून तातडीनं दुर्घटनाग्रस्त लोकलला हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. लवकरात लवकरच रेल्वे सेवा पूर्ववत आणण्याचं आव्हान रेल्वे कर्मचाऱ्यांवर आहे. सोमवारचा दिवस असल्यानं उपनगरीय लोकल सेवेवर चाकरमान्यांची गर्दी असते. संध्याकाळी ५ नंतर चाकरमानी कामावरुन घरी निघण्यासाठी गर्दी करतील. त्यामुळे लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.   दरम्यान, या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

Read in English

Web Title: Mumbai local Harbour line services are disrupted after a coach of a suburban local derailed while entering the platform at CSMT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.