उपाशी पोटी 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 05:06 PM2018-07-06T17:06:27+5:302018-07-06T17:39:34+5:30

उत्तम, निरोगी आरोग्यासाठी खाणं हे अत्यंत फायदेशीर असतं. मात्र तुम्हाला जर उपाशी पोटी काही पदार्थांचं सेवन करण्याची सवय असेल तर ते तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने थोडं घातक ठरू शकतं. त्यामुळेच रिकाम्या पोटी कोणकोणत्या गोष्टींचं सेवन करू नये हे जाणून घेऊया.

अनेक खाद्यपदार्थ तयार करताना टोमॅटोचा वापर केला जातो. तर काहींना कच्चा टोमॅटो खायला आवडतो. मात्र तुम्ही जर उपाशी पोटी खाण्याची सवय असेल तर थोडं थांबा कारण टोमॅटोमध्ये अॅसिडचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे उपाशी पोटी टोमॅटो खाल्लं असता त्याचा पोटाला त्रास होतो.

दारू ही शरिराला अपायकारक असतेच मात्र उपाशी पोटी दारुचे सेवन केले तर त्याचा अधिक त्रास होतो. तसेच पोटात जळजळ होते. अन्नाचे पचनही व्यवस्थित होत नाही.

दही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. मात्र उपाशी पोटी ते खाणं शक्यतो टाळा.

उपाशी पोटी लेमन सोडा पिणं टाळा कारण लेमन सोड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोनेट अॅसिड असतं. त्यामुळे त्याचा त्रास होण्याची शक्यता असते.

केळं खाण्याची अनेकांना सवय असते. पण उपाशी पोटी केळं खाल्ल्यास त्याचा शरिराला त्रास होण्याची शक्यता असते. शरिरात मॅग्नेशियमचे प्रमाण वाढून कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण कमी अधिक होते. त्यामुळेच त्याचा शरिराला त्रास होतो.

कॉफी हे सगळ्यांनाच आवडणारं पेय आहे. मात्र कॉफीमध्ये कॅफीन असल्याने उपाशी पोटी प्यायल्यास त्याचा त्रास होतो.

उपाशी पोटी मसालेदार पदार्थांचं सेवन करणं टाळा कारण मसाल्यांमुळे पोटात अँसिड तयार होऊन पोटदुखीचा त्रास सुरू होतो.