पोट कमी करण्याचे काही सोपे उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 03:12 PM2018-03-26T15:12:56+5:302018-03-26T15:16:50+5:30

मुंबई : जर तुम्हाला सतत बसून काम करावे लागत असेल, तर पोट वाढण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. यावर उत्तम उपाय म्हणजे एक्सर्साइज करा, परंतू यासाठी तुम्हाला वेळ मिळत नसेल तर काही बेसिक उपाय आहेत.

भूक लागली असता तुम्ही जेवण नाही केलं तर तुमच्या मेटाबॉलिज्ममध्ये बिघाड होतो आणि तुमच्या शरीर पोटाच्या चौबाजूने फॅट जमा होते. त्यामुळे दर दोन तासांनी काही तरी खावे.

संशोधनानुसार असे लक्षात आले आहे की, हसल्याने पोटाच्या मसल्स संकुचित होतात. त्यामुळे दुखी राहण्यापेक्षा हसत राहा.

दररोज 2 लीटर पाणी प्याल्याने तुमचे वजन नियंत्रित राहते. तसेच, डिहाइड्रेशनमुळे पोट वाढण्याची समस्या सुद्धा दूर होईल.

एका सर्व्हेनुसार असे समोर आले आहे की, महागडे गॅजेट्स नाही, परंतू सिट-अप्स फॅट कमी करण्यास जास्त प्रभावी असतात.